Breaking News

शिर्डीत पाकीटमारी करणार्‍या चौघांना अटक


शिर्डी/प्रतिनिधी ः
साईमंदिर परिसरात पाकीटमारी करणार्‍या चौघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली.
साई महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शिर्डीमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. शिर्डी उपविभागिय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासोबत पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले, मिथुन घुगे, पोलिस उपनिरीक्षक बारकू जाणे, संजय सोनवणे व इतर सहकारी शहरात गस्त करत असताना मंदिर परिसरामध्ये चार जण संशयितरित्या फिरताना दिसले.
 त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता पाकीटमारी करत असल्याचे सांगितले. या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची 14 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली.
शिर्डी शहरामध्ये जास्त नफेखोरी करणार्‍यांवरही स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  शिशिरकुमार देशमुख व त्यांच्या पथकाने मागील तीन दिवसांमध्ये 35पेक्षा जास्त जणांवर कारवाई केली.
वाहतुक शाखेकडूनही शिर्डी शहरात विशेष नजर ठेवण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर शिर्डी शहरामध्ये भाविकांची वर्दळ राहणार असल्याने कारवाई अधिक कडक करणार असल्याचे पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.