Breaking News

नाताळ सणानिमित्त ख्रिस्ती बांधवांची मिरवणूक  
 संगमनेर/प्रतिनिधी
 नाताळनिमित्त जगाला प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश पोहचवावा या उद्देशाने संगमनेर शहरातून ख्रिस्ती बांधवांनी मेणबत्ती हातात घेऊन शहरातील विविध भागातून प्रेम, दया, शांतीचे संदेश देत मिरवणूक काढण्यात आली. विविध वेषभूषा परिधान केलेली बालके, सांताक्लॉज ख्रिस्तीगीते मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
 मिरवणुकीमध्ये सेंटमेरी धर्मग्राम प्रमुख फा.सायमन शिनगारे, पिटर खंडागळे, आबा वाघमारे, अल्वीन कलगट्टगी, के.जोशी, रेव्ह.विकास संगमे, सि.शैला पंडित, कॉन्स्टंट बानसोडे, स्ट्रिझा, रोजाली आदी धर्मगुरुंनी विविध विविध भागात सलोखा, शांतता प्रस्तापित व्हावी यासाठी प्रार्थना केली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, .डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, किशोर पवार, नितीन अभंग, आप्पा खरे, वृशाली भ़डांगे आदींनी मेणबत्ती रॅलीचे स्वागत केले. याच बरोबर पा.ग्रेगरी केदारी, शिवाजी लांडगे, बापूसाहेब शेळके, शरद शेळके, दिपक शेळके, अमोल खरात, दत्तू भोसले या धर्मगुरुंनींही आपआपल्या चर्चमध्ये ख्रिस्ती जन्माचा संदेश देऊन विविध उपक्रम राबविले. रॅली यशस्विततेसाठी प्रा.बाबा खरात, ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, सुखदेव शेळके, कैलास भोसले, प्रभाकर गायकवाड, आर..गायकवाड, सत्यानंद कसाब, जयंत गायकवाड, रोहित रोहम, राजू साळवे, भाऊसाहेब पाळंदे आदींनी परिश्रम घेतले.