Breaking News

कापरी नदी पात्रातील अनधिकृत वाळू उपसा थांबविण्याची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी)-
ढवळपु
री (ता. पारनेर) नांदगाव (ता. नगर) येथे कापरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरु आहे. त्यामुळे या वाळूतस्करांवर तात्काळ कारवाई करुन वाळू उपसा थांबविण्यात यावा, अशी मागणी आदिवासी भिल्ल युवकांच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आदिवासी भिल्ल समाजातील युवकांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देऊन चर्चा केली.
निवेदनात म्हटले आहे, की आदिवासी समाजबांधवांना वाळू उपशाचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, वाळूतस्करांनी या भागात मोठी दहशत निर्माण केली आहे. सदरील अनधिकृत वाळू उपसा बंद करण्याच्या मागणीचे निवेदन देतांना सुरु असलेल्या वाळू उपसाचे व्हिडिओ चित्रीकरणदेखील युवकांनी दाखविले. यावेळी राजू पवार, खेमा घोगरे, रवी बर्डे  आदी उपस्थित होते. वाळू उपसा त्वरीत थांबविल्यास आत्मदहन करण्याचा इशारा युवकांनी दिला आहे.