Breaking News

मांडवगण येथे छप्पर पेटवले


कोळगाव/ प्रतिनिधी :
श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथील बशीर रेहमान काझी यांचे छप्पर शेतीच्या वादातून पेटवून देण्यात आले. 17 डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडली. सुदैवाने काझी व त्यांचे कुटुंबिय या रात्री घरी नव्हते. या घटनेबाबत श्रीगोंदे  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
  याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथे बशीर रेहमान काझी हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांचे नातेवाईक बादशू इस्माईल शेख, मुश्ताक इनामदार यांच्यात शेतीचा वाद होता. या वादातून 16 डिसेंबर रोजी हमीद शेख व बादशू शेख यांनी बशीर काझी यांना घरी येऊन तुझ्या मामाच्या मुलीला घरी येऊन देऊ नको नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली.
 दुसर्‍या दिवशी 17 डिसेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान बादशू इस्माईल शेख, समीर इनामदार, हमीद शब्बीर शेख, रफिक शेख (राहणार मांडवगण) यांनी शेतात येऊन शेतातील छप्पर पेटवून दिल्याची फिर्याद श्रीगोंदे पोलिस ठाण्यात देण्यात आली. या प्रकाराच्या दिवशी काझी व त्यांचे कुटुंबीय घरी नसल्याने मोठी हानी टळली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.