Breaking News

बोगस कर्मचारी दाखवून नऊ लाखांचा गैरव्यवहार


राहाता/ प्रतिनिधी :
राहाता नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे लिपीक अशोक बारकू साठे यांनी पाणी टंचाईच्या काळात हजेरीपत्रकावर बेकायदारित्या बारा कर्मचारी दाखवले. त्यातून चार लाख नऊ हजार 650 रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी राहाता नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी आशिमा मित्तल यांनी साठे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
राहाता नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी अतुल गोरक्ष लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 1 मार्च 2019 ते 31 जून 2019 या पाणी टंचाईच्या काळात नगरपरिषद पाणी पुरवठा विभागातील लिपीक अशोक साठे याने एकूण 24 कर्मचारी कंत्राटी पध्दतीने कामास घेतले होते. हजेरीपत्रक पडताळणी प्रशासनाने पाहिली असता प्रत्यक्षात 24 पैकी 12 कर्मचारी हजर मिळून आले. परंतु 24 कर्मचार्‍यांचे वेतन राहाता नगरपालिकेकडून अदा केले जात होते. त्यामुळे 12 कर्मचारी बेकायदारित्या दाखवून साठे याने आपल्या पदाचा गौरवापर केला. चार लाख नऊ हजार 650 रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. सागर वसंत बर्वे, पंकज रमेश खरात, शुभम किरण वाघमारे, शुभम संजय हेकरे, सुदाम विट्ठल अभंग, बबन सोमनाथ गुंजाळ, अर्जून रावसाहेब बनसोडे, विरेश दिलीप शिंदे, अविनाश सोपान देवकर, विशाल संजय गुंजाळ, रामभाऊ मोहनराव गरुड, रामदास भाऊसाहेब नवले आदी नावे  हजेरीपत्रकावर कामावर हजर असल्याचे दाखवून पालिका प्रशासनाची आर्थिक फसवणूक केली आहे, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
 या प्रकरणी राहाता पोलिसांत साठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.