Breaking News

युवकांचे राष्ट्र निर्मितीत योगदान: झावरे
पिंपळनेर/प्रतिनिधी
 राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या नैतिक मूल्यांचा विकास होतो. युवकांचे राष्ट्र निर्मितीत  महत्वाचे योगदान असते. श्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेले काम आनंद देणारे असून ते प्रमाणीक पणे केले पाहीजे, असे प्रतिपादन माजी सभापती राहुल झावरे यांनी केले.
 अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यूआर्टस कॉमर्स अँण्ड सायन्य कॉलेज पारनेर यांच्याद्वारे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर, प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, प्राचार्य महेश नगरकर, प्रा.संजय आहेर, डॉ.अशोक घोरपडे, प्रा. प्रतीक्षा तनपुरे, प्रा.शिवराम कोरडे आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
 पुढे बोलताना झावरे म्हणाले, कै.सॉलीसीटर गुलाबराव शेळके जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अँड.उदयराव शेळके आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून राबविलेले उपक्रम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेले श्रम हे गावासाठी महत्त्वाचे ठरतील. अशा शिबिरांमधून समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी पुढील काळात सादर करावेत, ज्यामुळे समाजास नवीन संदेश मिळेल. तसेच विद्यार्थ्यांनी अशा शिबीरात सहभाग घेतल्यास देशाची समाजाची सेवा त्यांच्या हातून सेवा घडून येइल समर्थ आणि श्रेष्ठ भारताचे स्वप्न पूर्ण होईल.