Breaking News

उपेक्षित समाजाचे जीवन म्हणजे अमुल्य साहित्याचा ठेवाः अशोक सोनवणे


DAILY LOKMANTHAN lokmanthan.manthan@gmail.com

8:52 PM (3 minutes ago)
to me
नाशिक/प्रतिनिधी
दलित आदिवासी भटके आणि ओबीसी यांचे जीवनमान हेच एक साहित्य आहे.त्यांचा श्वास,प्रत्येक पाऊल आणि जीवन जगतांना त्यांना करावा लागत असलेला संघर्ष कुठल्याही साहित्य कलाकृतीचा अजरामर ठेवा ठरू शकतो,साहित्यिकांनी हा ठेवा साहित्यात आणला तर अमुल्य साहित्य निर्मिती होऊ शकते.या नवनिर्मितीसाठी या समाजातून नवसाहित्यिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.त्या पार्श्वभूमीवर आजच्या या साहित्य संमेलनाची सुरूवात ऐतिहासिक ठरली आहे.माञ अधिकाअधिक जनसमुदायाला अशा संमेलनामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने खुल्या मैदानावर अशी संमेलने व्हायला हवीत असे प्रतिपादन लोकमंथनचे समुह संपादक तथा बारा बलुतेदार ओबीसी नेते अशोक सोनवणे यांनी केले.
लोकलढा सांस्कतिक चळवळी तर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नाशिकच्या रोटरी हाॕलमध्ये पार पडलेल्या  (दि.२९ डिसेंबर) ५ व्या दलित आदिवासी भटके ओबीसी संयुक्त संमेलनाचे उदघाटन अशोक सोनवणे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले,यावेळी विचारपीठावर संमेलन अध्यक्ष प्रा.राम बाहेती,उदघाटक अशोक सोनवणे,कवी संमेलन अध्यक्ष कवी सुरेश पाटोळे,सोपान खुडे,सेवानिवृत्त भाप्रसे अधिकारी बी.जी.वाघ,कल्पनाताई पांडे ,लोकलढा समन्वयक समाधान घोडेस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सुवर्णाताई गांगोडे यांनी अतिथींचे स्वागत केले.
उदघाटनानंतर बोलतांना अशोक सोनवणे यांनी दलित आदिवासी भटके ओबीसी संयुक्त साहित्य संमेलन ही काळाची गरज असून त्यादृष्टीने ही ऐतिहासीक सुरूवात ठरणार आहे.उपेक्षित वर्गापर्यंत सामाजिक ऐक्याचा विचार पोहचविण्यासाठी अशा संमेलनांचे विचारपीठ महत्वाचे माध्यम ठरणार आहे.लोकलढा चळवळीने अशा प्रकारची संमेलने खुल्या मैदानावर आयोजित करून ही साहित्य चळवळ अधिक लोकाभिमुख आणि सुदृढ करावी असे आवाहन त्यांनी केले.संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना प्रा.राम बाहेती म्हणाले की,आपली पृथ्वी शेषनागाच्या मस्तकास्तकावरून श्रमजिवींच्या तळहातावर देण्याचे क्रांतीकारी काम अण्णाभाऊं साठेंनी केले आहे.अण्णाभाऊंच्या साहित्यात श्रमजीवींच्या कष्टाचे प्रतिबिंब आरशात दिसणाऱ्या चेहऱ्यापेक्षा स्पष्ट होते आणि आहे.शेवटच्या श्वासापर्यंत अण्णाभाऊ कष्टकऱ्यांसोबत होते.अलिकडच्या काळात क्रांतीचे तत्वज्ञान सांगणारे साहित्यिक प्रस्थापित धनदांडग्यांच्या छावणीत दाखल होत आहेत.या संक्रमणावर गांभिर्याने विचारमंथन होणे गरजेचे आहे अशी खंतवजा अपेक्षा प्रा.बाहेती यांनी व्यक्त केली.
विचारवंत सोपान खुडे आणि कल्पनाताई पांडे यांनी परिसंवादात आपल्या विचार कथनातून मुक्ती साध्य करण्याची दिशा मुद्देसुद विषद केली.  संमेलनादरम्यान अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे,शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा,बाराबलुतेदारांना कर्जमुक्त करावे,एनआरसी सारखे कायदे रद्द करावेत, अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे पुनःप्रकाशन करावे,भटक्या विमुक्तांसह भुमीहीनांना शासकीय जमिनी द्याव्यात,भटक्या विमुक्तांच्या वसाहती निर्माण कराव्यात,ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासकीय निधी वाढवावा आदी ठराव एकमुखाने पारीत करण्यात आले.
यावेळी प्रा.अनिल शिरसाठ,शंकुतला मंकड,दगाजी अहिरे ,सम्यक विद्यार्थी आंदोलन,छाञभारती, मुक्ता साळवे महिला मंडळ आदी विविध सामाजिक क्षेञात कार्य बजावणाऱ्या कर्तृत्वानांचा सन्मान करण्यात आला.शाहिर शरद शेजवळ आणि सहकाऱ्यांनी गायलेले क्रांतीकारी गीत आकर्षण ठरले.कवी रविकांत शार्दुल,संतोष कांबळे आदींचे काव्यवाचन  झाले.संमेलनाच्या यशस्वितेसाठी लोकलढा समन्वयक समाधान घोडेस्वार,संजय पंरास,जयश्रीताई ढोले,दिनेश सोळसे,प्रदिप बडगे,संगिताताई विचारे,नंदिनीताई भालेराव,अंकुश वाघमारे,अशोक तांबे आदींनी परिश्रम घेतले.