Breaking News

राष्ट्रपतीच्या हस्ते पदवी स्विकारण्यास विद्यार्थीनीचा नकार


चेन्नई : कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश दिला न गेल्याने पुद्दुचेरी विद्यापीठात मास कम्युनिकेशन विषयात सुवर्ण पदक मिळवणार्‍या विद्यार्थीनीने राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला. रुबीहा अब्दुरहीम असी या विद्यार्थीनीचे नाव आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला याआधी तिने विरोध दर्शवला होता. सोशल मीडियावर नागरिकत्व कायद्याविरोधात रुबीहाने अनेकदा मत व्यक्त केले आहे. पदवीदान समारंभाला आल्यानंतर रुबीहाला विशेष पोलीस अधिक्षकांनी बाहेर बोलावून नेले. पुन्हा प्रवेश न देता बाहेरच उभा करण्यात आल्याचे रबीहाने म्हटले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भाषण आपल्याला हॉलच्या बाहेर उभा राहून ऐकावे लागले. मला बाहेर का काढले याबद्दल काहीच कल्पना नसून असे का केलं? असा सवालही रुबीहाने विचारला आहे. नागरिकत्व कायद्याला केलेला विरोध, आंदोलनात भाग घेतल्याने अशी वागणूक दिल्याची शक्यता असल्याचे मत रुबीहाने व्यक्त केले.