Breaking News

जलमित्र सुखदेव फुलारी यांना पर्यावरण रक्षक सन्मान पुरस्कार जाहीर


भेंडा / प्रतिनिधी
येथील जलमित्र, पत्रकार सुखदेव फुलारी यांना जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजस्थानमधील तरुण भारत संघ (टीबीएस) या समाजसेवी संस्थेच्यावतीने पर्यावरण संवर्धन कार्यासाठीचा 'पर्यावरण रक्षक सन्मान २०१९' हा  पुरस्कार जाहीर झाला आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी ३० मे १९७५ रोजी 'तरुण भारत संघ' या समाजसेवी संस्थेची स्थापना केली. जल संरक्षण, पाण्याचा अनुशासित उपयोग, नद्यांचे प्रदूषण रोखणे, भूजल शोषण रोखणे, भूजल पुनर्भरण करने ही कार्ये या संस्थेच्या माध्यमातून होत आहेत. दरम्यान, मकर संक्रांतीच्या दिवशी दि. १५ जानेवारी २०२० रोजी सकाळी वाजता तरुण भारत संघ आश्रम, भिकमपूर-किशोरी, ता. थानागाजी, जि.  अलवार (राजस्थान) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.