Breaking News

मका खरेदी केंद्रास शासनाची मंजुरी

अहमदनगर/प्रतिनिधी : सन 2019-20 खरीप पणन हंगाम किमान आधाभूत किंमत योजनेंंतर्गत धान व भरधान्य (ज्वारी, बाजरी व मका) खरेदीसाठी शासन निर्णयानुसार दर निश्‍चित करण्यात आले असून खरीप पणन हंगाम दिनांक 1 ऑक्टोबर 2019 ते 31 मार्च 2020, रब्बी पणन हंगाम (उन्हाळी) दि.1 मे 2020 ते 30 जून 2020 व भरडधान्य ज्वारी, बाजरी, मका  दि. 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2019 पर्यत कालावधी निश्‍चित करण्यात आलेला आहे.
जिल्हा मार्केटींग अधिकारी, अहमदनगर यांना शासकीय आधारभूत किंमतीने मका खरेदी करण्यासाठी जामखेड तालुक्यातील पुण्यश्‍लोक कृषी प्रक्रिया सह.संस्था, जामखेड
, राहुरी तालुक्यातील राहुरी तालुका खरेदी विक्री संघ लि,राहुरी, शेवगाव तालुक्यातील जगदंबा महिला ग्राहक सह.संस्था, शेवगाव, श्रीरामपूर तालुक्यातील तुळजा वुमेन्स स्टेट लेव्हल मल्टीपर्पज को.ऑप.सोसायटी श्रीरामपूर, संगमनेर तालुक्यातील संगमनेर ता. शेतकी सहकारी संघ लि, संगमनेर व अकोले तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोले या ठिकाणी केंद्र सुरु करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.