Breaking News

राज्यातील भाजप नेते शिवसेनेच्या संपर्कात : राऊत

मुंबई
राज्यातील केवळ पंकजा मुंडेच नाही तर अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राज्यातील बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहे. गेल्या सरकराने फक्त जाहीरातबाजीवर खर्च केला. महाराष्ट्राच्या पै पैवर जनतेचा अधिकार आहे, अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे. पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सांगितले की, पंकजा मुंडे काय राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. पंकजा मुंडेंबाबत 12 डिसेंबरला कळेल, असे संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे.
बुलेट ट्रेनचे ओझे आमच्या डोक्यावर नको. बुलेट ट्रेनसह सर्व प्रकल्पावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे राऊत यांनी सांगितले. जो निर्णय आरे संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे त्याचे स्वागत देशभरात होत आहे. आरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच नाणार संदर्भातील मागणीचा मुख्यमंत्री विचार करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. सरकार अतिशय उत्तम चालले आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा हा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. इतर पक्ष काय बोलला त्याला महत्व नाही. कोणाला कोणते खाते आणि मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आणि व्हायलाच पाहिजे. त्यासाठी 40 दिवस संघर्ष सुरु होता. उद्धव ठाकरेंच्या रुपाने मुख्यमंत्री झाल्याचा आनंद झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर आहे असल्याचे त्यांनी सांगितले.  केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे 80 तासांचे मुख्यमंत्री झाल्याचा दावा भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातून 40 हजार कोटी परत पाठवणे ही महाराष्ट्राबरोबर विश्‍वासघात असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देण्यात आलेले 40 हजार कोटी केंद्राला परत पाठवण्यासाठी 80 तासांचे मुख्यमंत्री बनले होते का ? असा अनंतकुमार हेगडे यांच्या दाव्याचा दाखला देत संजय राऊत यांनी सवाल केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. दुसरीकडे नवाब मलिक यांनीही भाजपवर टीका केली. या दाव्यात तथ्य असेल तर हा फक्त महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांवरही अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले. हे ठरवून केलेले नाटक होते. फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी 15 तासांच्या आत 40 हजार कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून केंद्राकडे परत पाठवले, असा दावा अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.

पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत
पंकजा मुंडे यांच्या पक्ष बदलाच्या विषयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या महत्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करत त्या मंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या आहेत. भाजपाच्या नेत्यांचं पंकजा मुंडे  यांच्याशी बोलणे झाले असून, त्या भाजपाची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणार्‍या अफवा थांबायला हव्यात, चंद्रकांत पाटील यांनी भाजपाची बाजू मांडली. त्यामुळे पंकजा वेगळा विचार करत आहेत असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.