Breaking News

गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींकडून मारहाण
 कोपरगाव / ता.प्रतिनिधी
 न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी नकार दिल्याच्या कारणावरून पाच आरोपींकडून दोघांना  मारहाण झाल्याची घटना पढेगाव येथे घडली.
  गुन्हा मागे घेतल्याच्या रागातून आरोपी मिलिंद बाबुराव भारूड, नितीन बबन भारूड, दीपक बबन भारूड, मैना बबन भारूड, किरण मिलिंद भारूड या पाच आरोपींनी फिर्यादी महिला अंगणवाडी सेविका रेखा भारूड (वय-३६) त्यांच्या पतीस लाकडी दांडक्याने लोखंडी गजाने मारहाण केली. तशी फिर्याद दाखल झाली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गु..नं.१४८/२०१९ भा..वि.कलम ३५४,३४१,५०४,५०६ नुसार २४ एप्रिल २०१९ रोजी गुन्हा दाखल केलेला आहे. त्याची कोपरगाव न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तो गुन्हा मागे घ्यावा या कारणासाठी वरील पाच आरोपीनी गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्याला आपल्या पतीस लाकडी दांडक्याने लोखंडी गजाने, बॅटीने लाथा बुक्य्यांनी मारहाण करून आपल्याला गंभीर दुखापत केली आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपींविरुद्ध गु..नं.४१७/२०१९ भा..वि.कलम ३२६,३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६,प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. गवसने करीत आहेत.