Breaking News

घुमटवाडीत सिंगल फेज न केल्यास धरणे


पाथर्डी/प्रतिनिधी ः
घुमटवाडीत सिंगल फेज वीजवितरण सुरु न केल्यास धरणे आंदोलनाचा इशारा  शहर शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
शिवसेनेच्या वतीने घुमटवाडी (कढाणी) गावातील सिंगल फेज कनेक्शन संदर्भात उपकार्यकारी अभियंता नीलेश मोरे यांना शिवसेना शहरप्रमुख सागर राठोड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
         निवेदनात म्हटले आहे की, आठ महिन्यांपासून महावितरण अधिकार्‍यांनी या प्रश्‍नावर आश्‍वासने दिली. परंतु याबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली आहेत. या कामासाठी नेमण्यात आलेला  ठेकेदार नीलेश विधाते यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद येत नाही. तरी त्या ठेकेदारावर कार्यवाही करावी. गावात सिंगल फेजचे काम पाच दिवसात पूर्ण करावे अन्यथा उपविभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन करु, त्यावेळी होणार्‍या परिणामास कार्यालय जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.
       निवेदन देताना शहरप्रमुख राठोड, युवा सेनेचे सचिन नागापुरे, समाधान बडे, रमेश फुंदे, अजय फुंदे, सुदर्शन बडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.