Breaking News

महिला पोलिस कर्मचार्‍यावर चाकूहल्ला

अहमदनगर/प्रतिनिधी : बंदोबस्तावरील महिला पोलीस कर्मचार्‍याच्या गळ्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करत आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना येथील जिल्हा कारागृहात सबजेल घडली. पावलस कचरू गायकवाड असे यातील आरोपीचे नाव आहे. तर सुजाता निवृत्ती शेळके (वय 27, नेमणूक : अहमदनगर जिल्हा कारागृह अहमदनगर)  असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे.
सुजाता शेळके या कारागृहातील मेन गेट येथे त्यांच्या सहकार्‍यांसोबत बंदोबस्ताला होत्या.
न्यायाधीन बंदी क्रमांक 107 / 2019  आरोपी पावलस कचरू गायकवाड याने स्वयंपाक गृहातील चाकू घेतला. कारागृहातून पळून जाण्याच्या उद्देशाने शेळके यां
चे डोक्याचे केस धरून गळ्यावर चाकूने वार केला. तो वार त्यांचे डाव्या हातावर झेलला असल्याने डाव्या हाताला दुखापत झाली. आरोपी गायकवाड याने शासकीय  कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करून कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.