Breaking News

सुगंधी तंबाखू आणि मशीन जप्त ; कँम्प पोलिसांची कारवाई

अहमदनगर / प्रतिनिधी
जी कामगिरी अन्न व औषध प्रशासना
ने करायला हवी, ती कारवाई या विभागाच्या सहकार्याविना कॅम्प पोलिसांनी केली. आज, दि. २९ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी २५ हजारांच्या  सुगंधी तंबाखू आणि अंदाजे ६० हजार रुपये किंमतीचे एक मशीन असा ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
नागरदेवळे गावातील राजेंद्र बबन खळदकर यांच्या राहत्या घरावरील मजल्यावर सुगंधी तंबाखू व सुपारी याचे मिश्रण करून गुटखा तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कॅम्प पोल्स ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय देशमुख आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुपारी बारीक करण्याचे मशीन, वजन काटा, सुपर तंबाखू तयार करण्याची मशीन व तयार करून छोटे-छोटे पाकिटात भरून ठेवलेली सुगंधी तंबाखू, बारीक केलेली सुपारी असे एकूण २४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चौकट
'अन्न व औषध प्रशासन नॉट रिचेबल'
गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू या धंद्यावर पोलीस कुठलीच कारवाई करत नाही, अशा बातम्या काही वृत्तपत्रांत {लोकमंथन नव्हे} प्रकाशित झाल्या. मात्र या धंद्यांवर कारवाई कारण्याची जबाबदारी ज्या अन्न व औषध प्रशासन या विभागाची आहे, त्या विभागाचे एकही अधिकारी या कारवाईकडे फिरकले नाहीत. विशेष म्हणजे यासंदर्भात कॅम्प पोलिसांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना सातत्याने संपर्क साधूनही संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नसल्याची पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा ऐकायला मिळाली.