Breaking News

कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा करण्याची परवानगी डॉ. जयस्वाल यांना कोणी दिली?


भिंगार / प्रतिनिधी
डॉक्टर बाबासाहेब हॉस्पिटल आंबेडकर हॉस्पिटलमध्ये २५ कर्मचाऱ्यांना तेथील डॉक्टर जयस्वाल यांनी पैसे जमा करणेसाठी एक बेकायदा नोटीस जारी केली आहे.  सातवे पे कमीशन आयोग सवलत लागू  झाली  किंवा नाही,  हे पाहणेकामी प्रिन्सिपल डायरेक्टर, पुणे ऑफिसला जाण्याकरता स्वतःच्या सहीनिशी रुपये दोनशे रुपये जमा करण्याची नोटीस डॉ. जयस्वाल यांनी काढली. ती बेकायदेशीर नोटीस काढण्यासाठी त्यांनी भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर विद्याधर पवार यांची परवानगी घेतली होती का, नसेल तर अशी बेकायदेशीर नोटीस त्यांनी कोणाच्या परवानगीने काढली, ही बेकायदा नोटीस काढल्याबद्दल कॅन्टोनमेंट बोर्डाचे  चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर विद्याधर पवार यांनी डॉ. जयस्वाल यांच्यावर कारवाई केली का, किंवा काय कारवाई करणार, असे असंख्य प्रश्न कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत.
शहराला नागरी सुविधा पुरविण्याचे काम अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासन पाहते. भिंगार शहरात  स्वच्छता राखणे, आरोग्य विषयक सोयीं सुविधा पुरवणे, इलेक्ट्रिक विभाग, बांधकाम यासाठी स्वतंत्र विभाग आहेत. त्यासाठी तेथे विभाग निहाय कर्मचारी नेमणूक आहेत. नेमणुक  केलेल्या कायम  कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या  अंतर्गत पगारविषयक सर्व सुविधा कायमस्वरूपी मिळत असतात. आरोग्य विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एकूण २५ कर्मचारी कामकाज पाहत आहेत. त्या कर्मचार्‍यांच्या बाबतीत एक धक्कादायक वृत्त हाती आले आहे. मात्र अशाप्रकारे बेकायदेशीर नोटिसा काढून पैसे जमा करणे त्यांना अधिकार कोणी दिले व अशा नोटिसा काढण्याचा त्यांचा उद्देश काय, या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता या सरकारी कामासाठी स्वतंत्र विभाग असून त्यासाठी या कार्यालयातील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी पत्रव्यवहार करून  रिपोर्ट पाठवून पाठपुराव्याद्वारे हे काम करून घेऊ शकतात. त्यासाठी असे बेकायदेशीर नोटिसा काढून पैसे जमा करण्याचा उद्देश काय, याचा खुलासा होणेही महत्वाचे आहे, अशी अपेक्षा भिंगारवासीय व्यक्त करत आहेत.