Breaking News

शाळेमुळे संस्कारक्षम युवाशक्ती घडते:काकडे


चापडगाव/प्रतिनिधी
 शाळा ही संस्कारक्षम पिढी घडविण्याचे केंद्र आहे. शाळेमधून दिलेले ज्ञान संस्कार यामधूनच समाज घडत असतो. शाळेमुळे संस्कारक्षम युवाशक्ती तयार होते, असे प्रतिपादन जि..सदस्य हर्षदा काकडे यांनी केले.
  शेकटे खुर्द येथील प्राथमिक शाळेच्या दुमजली इमारतीच्या बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी काकडे बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या निधीमधून हे काम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ मारकंडे हे होते. कार्यक्रमास बाळासाहेब जाधव, तात्यासाहेब मारकंडे, देवराव दारकुंडे, जगन्नाथ गावडे, विक्रम जाधव, किसन राठोड, संजय आंधळे, बप्पासाहेब बर्डे, जालिंदर आंधळे, शेषराव वंजारी, लक्ष्मण राठोड आदी उपस्थित होते.
  यावेळी काकडे बोलताना म्हणाल्या की, गावांमध्ये विकास काम करताना एकी असावी लागते त्यातूनच गावचा विकास होतो. विकासामध्ये राजकारण नको तसेच या भागातील शेतकरी बांधवांनी पाणीप्रश्नावर एकी दाखवून आपल्या गावातील वाहून जाणारे पाणी त्याच ठिकाणी अडवण्यासाठी काम केले पाहिजे. तालुक्याच्या पूर्व भागावर सतत दुष्काळाचे सावट असते. पाऊस भरपूर पडतो परंतु पाणी वाहून जाते. त्यामुळे गावच्या विकासासाठी गावकऱ्यांनी पाणीसाठा कसा वाढवता येईल याचे नियोजक करावे, तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रथमेश सोनवणे यांनी केले तर आभार जालिंदर आंधळे यांनी मानले.