Breaking News

संतप्त नागरिकांनी पकडून दिली भटकी कुत्री!


अहमदनगर / प्रतिनिधी
मोकाट जनावरे, भटकी कुत्री यांसह घाणीचे साम्राज्य अस्वच्छता अशा नागरी समस्यांमुळे तारकपूर परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्यांनी हैराण झालेल्या संतप्त नागरिकांनी अखेर आज दि. २६ दुपारी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाशी संपर्क साधून पथक बोलावून घेऊन परिसरातील मोकाट कुत्री पकडून दिली.
शहरातील तारकपूर परिसर अनेक समस्यांनी त्रस्त आहे. मोकाट जनावरे भटक्या कुत्र्यांचा या परिसरात मोठा वावर आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आणि महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून बाहेर पडण्यास मुलांना खेळण्यास प्रचंड घबराट पसरली आहे. या भागांत अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. या अस्वच्छतेमुळे मोकाट जनावरे, कुत्र्यांचा मोठा वावर वाढला आहे. त्यामुळे अखेर या परिसरातील नागरिकांनी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. संबंधित नगरसेवकांचे या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी हा पवित्रा घेतला. यावेळी मनोहर खूबचंदानी, बल्लू सचदेव, राजेश महाराज, अमित कांजन, विजय सहानी, दीपक काबरा आदींसह परिसरातील लहान मुले उपस्थित होती.