Breaking News

अहमदनगर / प्रतिनिधी
महागाईच्या युगात मोफत आरोग्य शिबीर सर्वसामान्यांसाठी आधार ठरत आहे. रुग्णसेवा हीदेखील समाजसेवा असून यामुळे एखाद्याला नवजीवन दिल्याचे पुण्य मिळत आहे. खर्चिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना पेलवत नाही. तर इच्छा असूनदेखील उपचार घेता येत नाही. मात्र अशा मोफत शिबिरात आरोग्य चळवळीला गती मिळून सदृढ समाजाची निर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन महापालिकेच्या नगरसेविका शितल जगताप यांनी केले. 
भिंगार बाजारतळ येथील श्रीराम मंदिरात झालेल्या मोफत आरोग्य तपासणी उपचार शिबिरास नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. कै. श्रीमती देवबाई किसन भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मॅक्सकेअर सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल, महात्मा फुले जन आरोग्य योजना भोसले परिवाराच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन नगरसेविका जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे, काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष आर. आर. पिल्ले, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, राष्ट्रवादी जिल्हा संघटक मतीन सय्यद, मतीन ठाकरे, सुहास धीवर, अतुल थोरात, शौकत शेख, मच्छिंद्र भांड, राजेंद्र पतके, सोपानराव साळवे, रविंद्र सोनवणे, श्यामराव वाघस्कर, बाळासाहेब सूर्यवंशी, अशोक भोसले, प्रकाश भोसले, मोहिनी भोसले, लता भोसले, नितीन अवचर, वर्षा अवचर, स्वाती सूर्यवंशी, बोधे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक भोसले यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या शिबीराचे आयोजन केल्याचे सांगत यामध्ये फक्त तपासणी करता नागरिकांना औषधोपचारदेखील उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगितले. या शिबीरात डॉ. सुदाम जरे, डॉ. आनंद काशीद, डॉ. राजेंद्रकुमार गायके, डॉ. राहुल मते, डॉ. प्रतिक्षा मगर, डॉ. सुदर्शन झरेकर, डॉ. जॉन उजागरे, डॉ. शालिनी उजागरे, डॉ. दिलीप भंडारी आदी तज्ञ डॉक्टरांनी २८० नागरिकांची आरोग्य तपासणी करून काहींना गरजेनुसार औषधे दिली.