Breaking News

'सृजन'तर्फे कर्जतमध्ये डास प्रतिबंधक धुरळणी
कर्जत/प्रतिनिधी
 आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि सृजनच्या माध्यमातून कर्जत शहरात डास प्रतिबंधक फवारणीस प्रारंभ करण्यात आला. बारामती ॲग्रीकल्चरल ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते आक्काबाई नगर येथे हा कार्यक्रम झाला.
 काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, नगरसेविका मनीषा सोनमाळी, पुजा म्हेत्रे, सचिन सोनमाळी, काकासाहेब तापकिर, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, संतोष म्हेत्रे, सुनील शेलार, वसंत कांबळे, रवींद्र सुपेकर, नामदेव थोरात, दत्ता कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रारंभ झाला. संतोष म्हेत्रे यांनी प्रास्ताविक केले. मनिषा सोनमाळी यांनी आभार मानले. कर्जत शहरातील रोगराई टाळण्याच्या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमाचे कर्जतकरांकडून स्वागत केले जात आहे.

चौकट
 रोहितला साथ द्या : सुनंदा पवार
 डेंग्यूमुळे कर्जतला एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने रोहित यांनी  या प्रश्‍नात लक्ष घातले. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यावर उपाययोजना म्हणून डास प्रतिबंधक धुरळणी मोहीम राबविण्यात येत आहे. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या कामाला साथ द्या,सर्व प्रश्न सुटतील असे आवाहन सुनंदा पवार यांनी यावेळी बोलताना केले.