Breaking News

अशोक सोनवणे यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी पुरस्कारअहमदनगर ः नगर शहरातील पत्रकारांनी स्थापन केलेल्या ‘अहमदनगर प्रेस क्लब’ या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांना जीवनगौरव तर दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक अशोक सोनवणे यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
याशिवाय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी (उत्कृष्ट प्रशासन प्रमुख), जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी जगन्नाथ थोर (उत्कृष्ट प्रशासन अधिकारी), कोहीनूर वस्त्रदालनाचे प्रदिपशेठ गांधी (आदर्श व्यावसायिक), नोबेल हॉस्पिटलचे डॉ. बापूसाहेब कांडेकर (उत्कृष्ट वैद्यकीय सेवा), ढवळपुरीचे (पारनेर) सरपंच डॉ. राजेश भनगडे (आदर्श कृतीशील सरपंच) व जिल्हा परिषदेच्या खांडके (ता. नगर) येथील शाळेला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच विविध दैनिकांच्या 23 पत्रकारांना अहमदनगर प्रेस क्लबचा ‘बेस्ट रिपोर्टर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी दिली.