Breaking News

क्रांतिकारकांच्या स्मृती प्रशासनाने कायम ठेवाव्यात : अ‍ॅड.पिल्ले

अहमदनगर/प्रतिनिधी : शहरातील झेंडीगेट येथील सध्या बंद असलेली दीपाली टॉकीज म्हणजे पूर्वीची सरोष टॉकीजवर 25 डिसेंबर 1942 ला स्वातंत्र्याच्या आदोलनात सरोष टॉकीजमध्ये इंग्रजांविरुद्ध आदोलनात क्रांतिकारकांनी बॉम्ब टाकला. यामुळे इंग्रज हादरले होते. त्या घटनेला 25 डिसेंबरला 77 वर्ष पूर्ण होत आहेत पण गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही सरोष बॉम्बस्फोटाचे स्मारक नगर किंवा भिंगारमध्ये होत नाही, अशी खंत भिंगार शहर काँग्रेस अध्यक्ष आर.आर.पिल्ले यांनी व्यक्त केली. 
याबाबत अधिक माहिती देताना पिल्ले म्हणाले, “1942 ला एका क्रांतिकारकाने पुण्यातील ऑर्डीनरी फॅक्टरीमधून चोरला व तो एका महिलेने पोटावर बॉम्ब ठेवून गर्भवती असल्याचे भासवून बसने भिंगारला आणला. त्याचा स्फोट कोठे करायचा, याचा विचार करून रत्नम पिल्ले, हबीब खान, पन्नालाल चौधरी, खोमणे यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली.  25 डिसेंबरला रात्रीच्या ‘चॉकलेट सोल्जर’ या चित्रपटाच्या शोला तिकीट काढून हबीब खान व रत्नम पिल्ले गेले. रात्री 11 वा. पिल्लेंनी इशारा केला व हबीबखान यांनी बॉम्ब टाकला.
 या क्रन्तिकारकाची दखल अजूनही सरकारने, जिल्हा प्रशासन, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड, नगर महानगरपालिका यांनी घेतली गेली नाही. सरोष बागेत इंग्रज सैनिकांची स्मृतीस्तंभ आहे. मात्र या क्रातिकारकांच्या नावाचा, त्यांच्या कार्याचा साधा फलक प्रशासन व मनपाने लावलेला नाही,असे शेवटी अ‍ॅड.पिल्ले यांनी सांगितले.