Breaking News

५ लाखांची अवैध दारू जप्त आरोपी अटकेत;राज्य उत्पादन शुल्कची कारवाई संगमनेर/प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तालुक्यातील गुंजाळवाडी, संगमनेर खुर्द आणि निमज येथे  मंगळवारी सायंकाळी ६ ते ११ वाजेच्या दरम्यान धडक कारवाई करत ५ लाख २६ हजार रुपयांची अवैध दारू आणि मुद्देमाल जप्त केला आहे.
 याबाबतची अधिक माहिती अशी की, गुप्त माहितीवरुन संगमनेर उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत गोवा राज्यात निर्मिती झालेली दारू महाराष्ट्र राज्यात विक्री करता प्रतिबंधित असलेल्या ७५० मिली, १२० आणि १८० मिलीच्या ४९ विदेशी मद्याच्या बाटल्यांची स्वीफ्ट कारमधून (क्र.एमएच.०४, डीएन.७७६५) वाहतूक करताना चालक जनार्दन निवृत्ती चुनाळे (रा.सांगवी भुसार, ता.कोपरगाव) याला अटक करण्यात आली. त्याकडून ४ लाख २९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याचा मुख्य सूत्र किरण विलास घुले (रा.सावरगाव घुले, ता.संगमनेर) हा फरार आहे. तर दुसर्‍या गुन्ह्यात निमज आणि संगमनेर खुर्द यथे अवैध देशी दारूची वाहतूक करताना दोन दुचाकीस्वार आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९७ हजार ४४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला करुन अटक केली आहे. नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाई पोलिस निरीक्षक आर.डी.वाजे आणि दुय्यम निरीक्षक आर.एल.कोकरे, पी.एस.कडभाने आणि पोलीस कर्मचारी अनिल मेंगाळ, विजय पाटोळे, सुनील निमसे, तोसिफ शेख यांच्या पथकाने केली आहे.