Breaking News

आदिवासींची शिक्षणातील गळती रोखण्यासाठी प्रयत्नशील : कुलकर्णीकोपरगाव/प्रतिनिधी
 आदिवासींच्या मुलांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाची रुची वाढली तरीही उच्चशिक्षणात गळती
आहे. उच्चशिक्षणातील गळती रोखण्यासाठी आदिवासी विभाग विषेश प्रयत्न करीत आहे असे मनोगत  महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मामालीक ध्यानपीठ शैक्षणिक क्रीडा संकुलात राज्यातील आदिवासी विभागाच्या एकलव्य निवासी शाळेच्या इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचे तिन दिवशीय अभ्यास शिबीर या मुलांना शिकवणा-या शिक्षकांचे पाच दिवसाच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराच्या सांगता समारंभाप्रसंगी कुलकर्णी बोलत होते. यावेळी आत्मामालीक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी, नाशिकचे संचालक प्रकाश आंधळे, आत्मामालीक ध्यानपीठाचे संत विवेकानंद, संत निजानंद, विश्वस्त विष्णुपंत पवार, डॉ.श्वेता कुलकर्णी, राजश्री कुलकर्णी, प्राचार्य सुधाकर मलीक, माणिकराव जाधव, मंत्रालय प्रतिनिधी सिद्धी मेहता आदी उपस्थित होते.
 यावेळी डॉ. कुलकर्णी बोलताना म्हणाले की, व्यक्ती उच्च शिक्षणाने एक पायरी वर जातो. त्यामुळे त्यांच्या जीवनाची उंची वाढून दुरदृष्टी निर्माण होते. त्यातून आदिवासींच्या मुलांना जीवनाचा मार्ग सापडतो. आदिवासींच्या मुलांना उच्चशिक्षणात मदत करुन नवा इतिहास घडवायचा आहे. आत्मामालीक येथे आदिवासींच्या मुलांसाठी शिक्षण,कला,क्रीडा,ध्यान आध्यात्माच्या शिकवणीतून चांगले कार्य केले जात आहे,  यावेळी संत विवेकानंद महाराज यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य टी. कलाथीनाथन यांनी केले. तर प्रकाश आंधळे यांनी विद्यार्थी शिक्षक यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. शिबीरार्थींची निवास, भोजनाची व्यवस्था आत्मामालीक ध्यानपिठात करण्यात आली होती. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आश्रमाचे विश्वस्त प्रकाश भट्ट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, योगेश गायके, नितीन शिंदे यांच्यासह विविध विभागाचे शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.