Breaking News

बोल्हेगाव फाटा ड्रेनेज समस्या तातडीने मार्गी लावावी : खासदार विखे

अहमदनगर/प्रतिनिधी : “आपल्याला महामार्ग वाचवून घाण पाण्याचा प्रश्‍न कायमचा सोडवायाचा आहे. त्यासाठी इतर पाण्याच्या पाईपलाइनला धक्का न लागता या ठिकाणापर्यत हे पाणी येत आहे तिथपर्यत रस्त्याच्या कडेला खोदून सर्व पाणी खालच्या बाजूला सोडण्यात यावे किंवा हे सर्व पाणी उपसून घ्यावे मग त्या ठिकाणाहुन नवीन पाईपलाईन करण्यात यावी हा एकच पर्याय आहे.  अधिकार्‍यांनी कागदपत्राचे कामकाज पूर्ण करावे आणि हा विषय तातडीने मार्गी लावावा. हा रस्ता ठेका सुप्रिमो कंपनीकडे  असून या कपंनीने देशातल्या कोणत्याच भागात चांगल्या प्रकारचे काम केले नाही’’ असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले.
बोल्हेगाव फाटा चौकातील ड्रेनेजचे घाण पाणी खाजगी प्लॉटमध्ये वाहत असल्याने रस्त्याची पाहणी करताना खासदार डॉ.सुजय विखे यांनी केली. यावेळी प्लॉटधारकांशी त्यांनी संवाध साधला.
विखे पुढे म्हणाले, “ संबंधित खात्याच्या मंत्र्याने सुप्रिमो कंपनीकडून इतकी टक्केवारी घेतली की त्याचा परिणाम म्हणजे कंपनीच बुडाली आणि त्याची भरपाई नगरकरांना करावी लागत आहे. परंतु आता तातडीने लवकरात लवकर या पाण्याचा तोडगा काढून कोणाच्याही खाजगी प्लॉटमध्ये पाणी सोडले जाणार नाही आणि हे पाणी खाजगी प्लॉटमधून बंद केले जाईल व काम पूर्ण केले जाईल.’’
यावेळी खासगी प्लॉटधारकांनी सांगितले की, बोल्हेगाव फाटा येथे ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लागत नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी नगर मनमाड महामार्ग खोदून ड्रेनेजचे पाणी समोरच्या बाजूला असणार्‍या खाजगी प्लॉटधारकाच्या प्लॉटमध्ये सोडले होते. त्यामुळे संबंधितांनी सार्वजनिक बांधकाम विभागाक डे याबाबत तक्रार केली होती. हा प्रश्‍न गंभीर झाल्यामुळे आणि ड्रेनेजचे पाणी आजही थांबविण्यात संबंधित खाते अपयशी ठरल्याने हे पाणी खाजगी प्लॉट धारकाच्या प्लॉटमध्ये वाहत आहे आणि हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने नागरिकांचे वाहन चालवताना मोठी कसरत होत आहे.’’
हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता गायकवाड, अभियंता अभय भांगे यांच्यासह पाहणी केली. यावेळी बाबासाहेब बनकर, नरेंद्र खुबचंदानी, रमेश खुबचंदानी, सागर बोरूडे, अजय बारस्कर, नीलेश भाकरेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.