Breaking News

एरंडोल येथील अपघातात सात जणांचा मृत्यू


एरंडोल : एरंडोल ते पिंपळकोठा गावादरम्यान झालेल्या कालीपिली व ट्रक अपघातात कालीपिली चालकासह सात प्रवासी ठार झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास हॉटेल प्रियंकाजवळ झाला आहे. मयतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. सर्व मयत हे एरंडोल शहरासह तालुक्यातील उत्राण येथील रहिवासी आहेत.
एरंडोल शहरापासून सहा किलोमीटर असलेल्या हॉटेल गौरी जवळ धुळे कडून जळगावकडे जाणार्‍या ट़्रकचा (एम एच 15 जी 8474) एक्सेल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यात जळगावकडून एरंडोलकडे जाणार्‍या कालीपिवळी गाडी क्रमांक (एमएच 19 वाय 5207) या गाडीवर आदळली. काली पिवळी गाडीतील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.