Breaking News

भाजपाच्या भिंगार शहराध्यक्षपदी वसंत राठोड

भिंगार/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या भिंगार शहराध्यक्षपदी वसंत राठोड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक श्रीकांत साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, नगर शहर सरचिटणीस किशोर बोरा, भिंगारचे मावळते शहराध्यक्ष शिवाजी दहीहंडे, कॅन्टो.बोर्डसदस्य शुभांगी साठे, गणेश साठे,
वैशाली कटोरे उपस्थित होते. याप्रसंगी शहराध्यक्षपदासाठी वसंत राठोड यांच्या नावाची सूचना शिवाजी दहीहंडे यांनी मानली. त्यास शुभांगी साठे यांनी अनुमोदन दिले. यावेळी कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणीत अध्यक्ष वसंत राठोड, उपाध्यक्ष राजू दहीहंडे, सुरेश तनपुरे, कैलास गव्हाणे, संतोष हजारे, संघटन सरचिटणीस किशोर कटोरे, सरचिटणीस प्रमोद देठ, चिटणीस विशाल सदलापूरकर, सूरज रवे, ब्रिजेश लाड, जयप्रकाश विधाटे, खजिनदार दीपक फळे, कार्यकारिणी सदस्य बाळकृष्ण यंबारे, अंबादास धडसिंग, स्वप्नील शेलार, योगश भोसले, दशरथ तोरडी, सचिन फिरोदिया, दिनेश बुर्‍हाडे, नीलेश पराते, योगेश दळवी, सचिन पेंदूरकर, सोशल मीडिया प्रमुख कैलास काटे. कायम निमंत्रित सदस्य - महेंद्र जाधव, दामोदर माखीजा, रितेश बकरे, प्रकाश रासकर, शुभांगी साठे, शिवाजी दहिहंडे यांचा समावेश आहे.
कॅन्टोन्मेंट निवडणूक
स्वबळावर लढविणार : सुवेंद्र गांधी
भिंगार शहरामध्ये भाजपाची संघटनात्मक निवडणूक बिनविरोध झाली आहे. शहरात भाजपाची ताकद मोठी आहे. त्यामुळे लवकरच होणारी भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक भाजपा स्वबळावर लढविणार असून प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार दिले जाणार आहेत. केंद्र सरकारकडून भिंगार शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे सुवेंद्र गांधी यांनी सांगितले.
पक्षाची ध्येयधोरणे
शेवटच्या घटकापर्यंत नेणार : राठोड
सर्व पदाधिकार्‍यांनी आपणावर विश्‍वास दाखवून पुन्हा एकदा भिंगारच्या शहराध्यक्षपदी निवड केली आहे. पक्षाची ध्येयधोरणे शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती प्रत्येक घरोघर पोहोचविण्याचे काम करणार असून माजी खा. दिलीप गांधी व खा. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली भिंगार शहराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करू, असे वसंत राठोड यांनी सांगितले.