Breaking News

भाजपाला महापुरूषांच्या नावाची असुया काः जयंत पाटलांचा सभागृहात सवाल

मुंबई
ठाकरे सरकारने आज बहुमताची यशस्वी चाचणी पार केली आणि आपल्याला १६९ आमदारांचा पाठींबा आहे हे उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहात सिद्ध केले. भाजपने मात्र सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले तसेच हे कामकाज संविधानिक पद्धतीने होत नसल्याचा देखील यावेळी फडणवीस यांनी आरोप केला. बहुमत सिद्ध झाल्यानंतर जयंत पाटील यांनी या सर्व प्रश्नांना उत्तर देताना भाष्य केले दमदार असावा असे आम्ही समजत होतो मात्र हे सभात्याग करून गेले अशा शब्दात जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. तसेच न्यायालयाने आदेश दिला म्हणून आपण असे केले. यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत होणार घोडेबाजार थांबला. तसेच अध्यक्ष निवडीबाबत भाजपने जे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, मंत्रिमंडळाला प्रोटेम स्पीकर बदलाचा अधिकार आहे. मात्र भाजपने याबाबतचे सगळे नियम बाजूला ठेवले.शपथ घेताना आम्ही आमच्या आई वडिलांचे, नेत्यांचे नाव घेतले तर भाजपला एवढा राग का आला असा सवाल देखील जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जणू विरोधी पक्षनेते पदासाठी स्पर्धा सुरु असल्याचे देखील जयंत पाटील यांनी सांगितले.

"मी वारंवार शिवाजी महाराजांचे आणि माझ्या आई वडिलांचे नाव घेत राहीलसर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला याबाबत सर्वांचे आभार
आम्हाला सुधारकांचा महाराष्ट्र अपेक्षित आहे. आम्ही सर्व मिळून चांगला महाराष्ट्र घडवू" 
-उध्दव ठाकरे,मुख्यमंञी