Breaking News

गुगळे हायस्कूल व वारे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन

अहमदनगर/प्रतिनिधी : “जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपण कोणतेही क्षेत्र पादक्रांत करु शकतो. यासाठी आपण निश्‍चित ध्येय ठेवून त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. विद्यार्थीदशेत पुढील आयुष्यात काय करायचे आहे, हे आपल्या क्षमता ओळखून वाटचाल केली पाहिजे. शिक्षक हे आपणास घडविण्याचे काम करताना त्यांची शिकवण ही आयुष्यात वेळोवेळी मार्गदर्शक ठरणारी आहे’’, असे प्रतिपादन सुमन ग्राफिक्सचे संचालक सचिन भंडारी यांनी केले.
येथील शिशु संगोपन संस्थेच्या श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे दीपप्रज्वलन सचिन भंडारी यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक विराज भंडारे, अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, सहसचिव राजेश झालानी, माणिकराव मुंडे, प्राचार्या कांचन गावडे, मुख्याध्यापिका योगिता गांधी आदी उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा यांनी मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी विराज भंडारे यांनी 31 हजार रुपये, सचिन भंडारी यांनी 21 हजार रुपये व माणिकराव मुंडे यांनी रु.3100 देणगी संस्थेस जाहीर केली. प्राचार्या कांचन गावडे यांनी अहवाल वाचून करुन शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
कार्यक्रमास एल.के.आव्हाड, बन्सी नन्नवरे, चंद्रकांत आनेचा, शिवनारायण वर्मा, सुराणा, पारनाईक यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.