Breaking News

प्रत्येकाला घर असावे यासाठी प्रयत्न : भैलुमे
कर्जत/प्रतिनिधी
 कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत फक्त नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले आणि देत राहणार आहोत. प्रत्येकाला चांगले घर असावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. आज ज्यांना घर मंजूर केले आहे त्यांनी तातडीने बांधकाम सुरू करावे असे आवाहन नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांनी केले.
 कर्जत नगरपंचायतीच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ३७७ घरकूल मंजूर झाले. त्या लाभार्थींना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक बापूसाहेब नेटके, सचिन घुले, डॉ.संदीप बरबडे, नगरसेविका
मंगलताई तोरडमल, उषा म्हेत्रे, हर्षदा काळदाते, मनिषा सोनमाळी, निता कचरे,
वृषाली पाटील, सुधाकर समुद्र, लालासाहेब शेळके, नाना कचरे, नितीन तोरडमल, सतिष समुद्र, कार्यालयीन प्रमुख संतोष समुद्र, सुनील नेवसे, विलास शिंदे, बापू उकिरडे, गोकूळ पवार हे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. यावेळी नगरसेवक बापूसाहेब नेटके, उषा म्हेत्रे, हर्षदा
काळदाते, वृषाली पाटील यांची भाषणे झाली.


  घरे कायम करणार
 शासनाच्या जागेमध्ये जे लोक राहत आहेत,त्यांना ती जागा कायमस्वरूपी देऊन त्यांची घरे कायम करु. लोकांनी नगरपंचायतशी संपर्क करावा त्याचा पाठपुरावा केला जाईल असे आश्‍वासन उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी दिले.