Breaking News

परदेशातील भारतीयांचा आज मेळावा

अहमदनगर / प्रतिनिधी
नोकरी, शिक्षण किंवा अन्य कोणत्याची कारणांसाठी परदेशात राहत असलेल्या भारतीयांचा आणि त्यांच्या पालकांचा उद्या, दि. २२ सायंकाळी ५ ते ८ यावेळेत आयोजित करण्यात आला आहे. प्रोफेसर कॉलनीजवळील जॉगिंग पार्कलगत सिनर्जी अकादमीमध्ये हा मेळावा होणार आहे. परदेशात भारतीयांचा एकमेकांशी आणि आपापल्या अनुभवातून दुसऱ्यांना मदत होणे, हा या मेळाव्याचा हेतू आहे. या स्नेहमेळाव्यामुळे नागरिकांना परदेशात शिक्षणासाठी लागणाऱ्या आंतरराष्ट्रीय परीक्षा, व्हिसा प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रांची जमवाजमवी यांचीही माहिती इतरांकडून मिळू शकते. त्याचप्रमाणे परदेशातील विद्यापीठे, त्यांचे कोर्सेस, त्यांची फी, शैक्षिणक कर्जे यांचीही माहिती मिळत