Breaking News

दिल्लीसह उत्तर भारतात भुकंपाचे धक्के


नवी दिल्ली : देशातील उत्तर भारतात शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. 50 सेकंद या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बसताच घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल ऐवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदु कुश येथे होता. दिल्ली-एनसीआरसह जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हरियाणातील अनेक भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. 
भूकंपाचे धक्के बसताच शहरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली तर कर्मचार्‍यांनी ऑफिसच्या बाहेर धाव घेतली. भूकंपाच्या धक्क्यामुळे कपाट, पंखा, कम्प्युटर हालले असल्याचे नागरिकांनी सांगितले. भूकंपाच्या धक्क्यामुळे अद्याप काही नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही.  अफगाणिस्तानच्या हिंदूकुशमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले ऊसन जीवमुठीत घेऊन असंख्य लोकांना भीतीपोटी घराबाहेर तसेच कार्यालयाबाहेर पडावे लागले. दरम्यान, भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचं कोणतंही वृत्त आलेलं नाही. भारतच नव्हे तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि उज्बेकिस्तानमध्येही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेकांच्या घरातील भांडी आणि इतर चीज वस्तू खाली पडल्या. त्यामुळे काही कळायच्या आतच लोक घरातून बाहेर पडले आणि त्यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. पाकिस्तानच्या इस्लामाबाद, पेशावर आणि रावळपिंडीतही भूंकपाचे जोरदार धक्के जाणवले. पाकिस्तानमध्ये तब्बल 10 सेकंद जमीन हादरल्याने लोकांमध्ये एकच धावपळ उडाली. अफगाणिस्तानात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळे अफगाणिस्तानात भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले. भूकंपामुळे अफगाणिस्तानात झालेल्या जीवित वा वित्तहानीची अद्याप माहिती आलेली नाही. भूकंपाचे झटके जाणवताच बिथरलेल्या लोकांनी घरातून आणि कार्यालयातून तात्काळ पळ काढला. भारतासह पाकिस्तान, उज्बेकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे झालेल्या हानीची अद्याप माहिती आलेली नाही. मात्र भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.