Breaking News

पंतप्रधान मोदींनी केला अटल भूजल योजनेचा शुभारंभ


नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अटल भूजल योजनेचे उद्घाटन केले. शेतकरी, तरुणांनी पाणी वाचवा’ मोहिम हाती घ्यावी असे सांगत त्यांनी यावेळी त्यांनी पाणी बचत करा, असे आवाहन केले आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात हा कार्यक्रम पार पडला. 
यावेळी जलशक्ती मिशन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले. केंद्र सरकारने अलीकडेच अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीला मंजूरी दिली आहे. पाच वर्षांच्या (2020-21 ते 20124-25) काळात सहा हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. या योजना सुरूवातीला देशातील महाराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर या सात राज्यात राबवण्यात येणार आहे. यात आठ हजार 350 ग्राम पंचायती आणि 78 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. यावेळी मोदी म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचा उद्देश पूर्ण केला जाईल. ज्या भागांतील पाणीपातळीत प्रचंड मोठ्या प्रमाणात घट होत आहे अशा भागांकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. यावेळी मोदी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. हिमाचल प्रदेशला लेह-लडाखशी जोडणार्‍या रोहतांग बोगद्याला ’अटल बोगदा’ असे  नाव देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. हा बोगदा सुरक्षेसह पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असून अटलबिहारी वाजपेयींच्या स्वप्नांना त्यांच्या नावाशी जोडण्याचं भाग्य मला लाभेल याचा मी कधीच विचार केला नव्हता, असेही मोदी म्हणाले. पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात होणारी घट होत आहे. त्याबाबत मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. ’मी जेव्हा पंजाबमध्ये काम करत होतो, त्यावेळी पाणीपातळी वाढल्याने शेतीचे नुकसान होत असल्याची चर्चा व्हायची. पण वीस वर्षांनंतर पाणीपातळीत इतकी घट झाली आहे की, त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे अशी चर्चा होत आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी जी धोरणे अवलंबणे गरजेचे होते, ती राबवण्यास मागील सरकारे अपयशी ठरली आहेत,’ असेही ते म्हणाले.


चौकट . . . .
या सात राज्यांना होणार लाभ
अटल भूजल योजनेचा सर्वाधिक लाभ सात राज्यांना होईल. या राज्यांत पाणीपातळीत प्रचंड वेगाने घट होत आहे. या योजनेचा फायदा महाराष्ट्रासह हरयाणा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना होईल. ही सात राज्ये वाटत असली तरी या देशाचा 50 टक्के भाग आहेत. या सात राज्यांतील 78 जिल्ह्यांमधील 8300 गावांमधील पाणीपातळीची स्थिती खूपच गंभीर आहे, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले.

चौकट. . . . .
प्रत्येक घरात पाच वर्षांत पाणी
या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहचवण्यात येईल. ग्रामीण भागातील 18 कोटी घरांमध्ये फक्त 3 कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवले जात आहे. पुढील पाच वर्षांत ग्रामीण क्षेत्रातील 15 कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्यात येणार आहे. पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारे पाण्यावर साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहेत, अशी माहितीही मोदी यांनी यावेळी दिली.