Breaking News

मेट्रोच्या चारच्या वृक्ष तोडीला लागला पुन्हा ब्रेक

Metro4
ठाणे
मध्यरात्री मेट्रोच्या कामासाठी तीन हात नाका परिसरात वृक्ष तोड झाल्याच्या प्रकारानंतर ज्या ठेकेदारांच्या आणि अधिका:यांच्या माध्यमातून ही वृक्षतोड करण्यात आली, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे असे पत्र महापौर नरेश म्हस्के यांनी पालिकेच्या वृक्षराधिकारण विभागाला दिले होते. त्यानुसार गुन्हे दाखलही झाले. आता या संदर्भात पुन्हा ठाणो नागरीक प्रतिष्ठान आणि रोहीत जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याची सुनावणी सोमवारी झाली.
न्यायालयाने जैसे थे आदेश दिले आहेत. त्यामुळे तुर्ताच मेट्रो चार च्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. तर या संदर्भात सुधारीत याचिका दाखल करण्यासाठी एक आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे अशी माहिती याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी दिली. वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-4 च्या प्रकल्पाचे काम ठाण्यात जोमाने सुरु आहे. तीन हात नाक्यावर मेट्रोचे स्टेशन येणार आहे. या प्रकल्पच्या आड येणा:या वृक्षांची यासाठी कत्तल केली जाणार आहे. मात्र पर्यावरणाची हानी यामुळे होऊ नये, वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी ही मेट्रो भुयारी असावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर मेट्रोसाठी वृक्षांची कत्तल करण्यास न्यायालयाने स्थिगती दिली होती. मात्न ही स्थगिती 25 नोव्हेंबरला उठवल्यानंतर मागील आठवड्यात बुधवारी मध्यरात्री ठाण्यातील तीन हात नाका परिसरात काही वृक्षांची कत्तल करण्याचा प्रकार घडला होता. परंतु मनसेच्या कार्यकत्र्यानी हा प्रकार हाणून पाडला होता. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते रोहित जोशी आणि ठाणो नागरीक प्रतिष्ठान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो चार प्रकल्पासाठी वृक्ष तोड करू नये यावरील स्थगिती उठविण्याचा जो निर्णय दिला होता त्याला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. त्याचप्रमाणे वृक्षतोड करू नये याकरिता याचिकाकत्र्याना सुधारित याचिका दाखल करण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी दिला असल्याची माहिती जोशी आणि उन्मेश बागवे यांनी दिली.