Breaking News

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कर प्रमुखपदी वर्णी

नवी दिल्ली - लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कर प्रमुखपदी वर्णी लागली आहे. भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा कार्यभार ते सांभळतील. सध्याच्या घडीला लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. नरवणे हे मूळचे पुण्याचे असून शालेय तसेच प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ’ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे.  
लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या कार्यभार जनरल मनोज मुकुंद नरवणे सांभाळणार आहेत. 39 वर्षाच्या लष्करी सेवेमध्ये मनोज नरवणे यांनी राष्ट्रीय रायफल बटालियन, स्ट्राईक कॉर्प आणि लष्करी प्रशिक्षण कमांडचे नेतृत्व केले आहे. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. ते श्रीलंकेत गेलेल्या भारतीय शांती सैन्याचा भाग होते. 1980 मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या 7व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. वीणा नरवणे या त्यांच्या पत्नी आहेत. या दांम्पत्याला दोन मुली आहेत. नरवणे जून 1980 मध्ये लष्करात दाखल झाले. शीख लाईट इन्फ्रंट्रीमधून त्यांच्या कारकीर्दीला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ’इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ’जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महुस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. आपल्या 37 वर्षांतील सेवेच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर लष्कर प्रमुखाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे (59) हे चीन विषयाचे तज्ञ समजले जातात. ईशान्य भारतात आणि जम्मू-काश्मीरमध्ये बंडखोरांविरुद्ध कारवाई करण्याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. सध्या ते उपलष्करप्रमुख आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आज ईशान्य भारत आणि काश्मीरमध्ये भारतासमोर अनेक आव्हाने आहेत. पाकिस्तान आणि चीनकडूनही धोका आहे. मनोज नरवणे यांचा प्रदीर्घ अनुभव राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी निर्णय घेताना अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.
भारतीय लष्करापुढील आव्हाने 
सैन्याच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम चालू ठेवण्यासाठी पुरेसा निधी मिळवण्याचे नरवणे यांच्यासमोर आव्हान असेल. लष्कर, नौदल आणि हवाई दल निधी कमतरतेच्या समस्येचा सामना करत आहेत. त्याचा अत्याधुनिक शस्त्रास्त्र खरेदीला फटका बसला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आज ईशान्य भारत आणि काश्मीरमध्ये भारतासमोर अनेक आव्हाने आहेत. पाकिस्तान आणि चीनकडूनही धोका आहे. मनोज नरवणे यांचा प्रदीर्घ अनुभव राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी निर्णय घेताना अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.