Breaking News

उड्डाणपुलासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाचे शर्थीचे प्रयत्न!


अहमदनगर / प्रतिनिधी
शहरवासियांचा जीवन मरणाचा विषय असलेल्या उडाणपुलाच्या कामासाठी महानगरपालिकेचा नगर रचना विभाग शर्थीचे प्रयत्न करत असून यासाठी लागणाऱ्या जागेचे हस्तांतरण, मोजणी, सिटी सर्व्हे कार्यालयाकडून कराव्या लागणाऱ्या सर्व बारिक सारिक हाल
चाली आणि या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून तो प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविणे आदी कामे मनपाच्या नगर रचना विभागाने बहुतांशपणे पूर्ण करीत आणली आहेत. 
उड्डाणपुलासाठी आतापर्यंत सात जागांची खरेदी प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यातील दोन जागांवर बँकेचा बोजा असल्याने संबंधित बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. यात लष्करी प्रशासनाकडून मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने वेळ लागत आहे. मात्र दोन तीन महिन्यात ही प्रक्रिया पूर्णत्वास जाईल, असा विश्वास या विभागाने व्यक्त केला.
चौकट
निष्पाप लोकांचे प्राण वाचतील
सक्कर चौक ते कोठी चौक या दरम्यान होणाऱ्या उड्डाणपुलामुळे भविष्यात अहमदनगर शहराचा चेहरा खऱ्या अर्थाने बदलणार आहे. या पुलाअभावी आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. नगर औरंगाबाद महामार्गावरील डीएसपी चौक, नटराज चौक, कोठला परिसर, स्टेट बँक चौक, चांदणी चौक, कोठी चौक, मार्केटयार्ड चौक, इंपिरियल चौक, स्वस्तिक चौक आणि सक्कर चौक या परिसरात अवजड वाहनांची प्रचंड गर्दी असते. परिणामी या परिसरात सातत्याने अपघात आले आहेत. उड्डाणपूल झाल्यास ही सारी अवजड वाहतूक पुलाखालून आणि कार, दुचाकी, रिक्षा अशी हलकी वाहने उड्डाणपुलावरून धावतील. त्यामुळे संभाव्य उड्डाणपुलामुळे निदान निष्पाप लोकांचे प्राण तरी वाचणार आहेत.
सेवानिवृत्त तहसीलदार आणि सर्व्हेअर यांची महत्वपूर्ण भूमिका
उड्डाणपुलासाठी जागेचे हस्तांतरण, मोजमाप, सिटी सर्व्हे कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करणे, संबंधित जागेचे नकाशे, सात बारा, आठ अशी महत्वाची कागदपत्र गोळा करणे, जागेचे मुल्याकंन ठरविणे ही सारी कामे पार पाडण्याची भूमिका नगर रचना विभागात जे अधिकारी पार पाडत आहेत, ते महापालिकेचे कर्मचारी नसून सेवानिवृत्त तहसीलदार सर्जेराव शिंदे आणि सिटी सर्व्हे कार्यलयात मोजणी अधिकाऱ्याचे काम पाहणारे सेवानिवृत्त अधिकारी पठाण हे दोघे उड्डाणपुलासाठी महत्वाची मोठी कठीण भूमिका पार पाडत आहेत.