Breaking News

कारवाढीविरोधात मनसे आक्रमक पाथर्डी नगरपालिकेत आंदोलन;नागराध्यक्षांना घेरावपाथर्डी/प्रतिनिधी
 शहरात नगरपालिकेच्या वतीने स्वतःची कुठलीही शैक्षणिक सुविधा नसताना शिक्षण कर, मागील पाच वर्षात एकही झाड लावलेले नसताना वृक्ष कर अग्निशमन गाडीवर एकदाच खर्च झालेला असताना त्याच्या कितीतरी अधिक पटीने अग्निशमन कर आकाराला जात आहे. असा आरोप करत नगरपालिकेने घरपट्टी इतर पट्ट्यांच्या करात केलेल्या वाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले.
 नगरपालिका यामधून दरवर्षी लाखो रुपयांची लुटमार करत आहे. कुठल्या अधिकारात ही दरवाढ केली जात आहे? या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे अपेक्षित असताना विरोधी सदस्य गप्प का बसले? आदी प्रश्नांची सरबत्ती यावेळी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांच्यावर आंदोलनकर्त्यांनी केली.
 यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश चव्हाण, परिवहन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश पालवे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रविण शिरसाट, शहराध्यक्ष सुभाष घोरपडे, शहर सचिव संदिप काकडे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण डांगे अशोक आधळे, एकनाथ भंडारी, हुमायून आतार अदींसह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 पाथर्डी नागरपालिकेच्यावतीने दि.१९ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील नागरिकांवर अन्यायकारक रितीने पाणीपट्टीत सरसकट ६०० रु घरपट्टीतही वाढ करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. दुष्काळ नंतरची अतिवृष्टी यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला असून ऊसतोडणी कामगार कारखान्यात तोडणीसाठी जात असल्यामुळे अगोदरच वर्षातील पाच महिनेच चालणारी बाजारपेठ जवळपास बंद असल्यासारखी परिस्थिती आहे. या कामगार वर्गावर सध्याच्या मंदीच्या काळामध्ये जमाखर्चाचा ताळेबंद जुळत नसताना सर्वसामान्यांवर नगरपालिकेच्यावतीने हा दरवाढीचा बोजा लादला गेला आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनीयावेळी व्यक्त केली. यावेळी नगरपालिकेच्यावतीने नगराध्यक्ष डॉ. गर्जे यांनी पंधरा दिवसाची मुदत मागितली. या काळात जर ही दरवाढ रद्द केल्यास नगरपालिकेच्या कार्यालयात मनसेच्या वतीने 'हल्लाबोल' आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला