Breaking News

राजू शेट्टी यांना कृषिमंत्रीपदाची जबाबदारी द्या

Raju Shetty
पुणे
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. या नव्या सरकारमध्ये कृषिमंत्री पदाची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र विभागातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. राजू शेट्टी यांनी नेहमीच शेतकर्‍यांवरील अन्यायाविरोधात जोरदार लढा दिला, त्यांचे आंदोलनही यशस्वी झाले होते. अन्नधान्य, ऊस, कापूस, दुधाला योग्य खरेदीदर मिळावा. तसेच त्यांनी पीकविम्यासाठी आंदोलनही केली आहेत. त्यामुळे त्यांना कृषिमंत्रीपद देण्याची मागणी केली आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र विभागाने म्हटलं आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारमध्ये राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील सहभागी आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी राजू शेट्टी यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. दरम्यान, समोरून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आपण नक्की राज्याचं कृषिमंत्री पद स्वीकारू, अशी इच्छा राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.