Breaking News

कर्जतमध्ये पेंशन हक्क संघटनेचे धरणे कर्जत/प्रतिनिधी
 कर्जत पंचायत समितीसमोर शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत धरणे आंदोलन करण्यात आलेे. यावेळी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
 कर्जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. यामध्ये मेडिकल बीले, वेतन फरक, आयोगातील चुका, डिसिपीएस कपातीच्या हिशोबाचा घोळ, शिक्षक अदालततीचे आयोजन असे अनेक प्रश्न वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतल्याने महा.राज्य जुनी पेंशन हक्क संघटन कर्जत शाखेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी मिना शिवगुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच यावेळी दिलीप जाधव यांनी आंदोलक प्रशासन यांच्यामध्ये यशस्वी मध्यस्थी केल्याने तोडगा निघाला प्रशासनाने सर्व प्रश्न महिनाभरात मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
 यावेळी दिलीप जाधव, पेंशन संघटनेचे राज कदम, गणपत चव्हाण, राज्य मागासवर्गीय संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद गाडे, शिक्षक भारतीचे दिनेश खोसे, शिक्षक समितीचे मधुकर रसाळ, शिक्षक संघाचे आदिकराव बचाटे, ईब्टाचे अनिल साळवे, विठ्ठल साळवे, बँकेचे माजी संचालक संजय पवार, बाबुशाम पवार, नवनाथ दिवटे, गंगाधर नष्टे, पेंशन संघटनेचे सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.