Breaking News

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणार्‍या ‘त्या’ शेतकर्‍यांसाठी वेगळया योजनेचा विचार


मुंबई/पुणे : . दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकर्‍यांचा आम्ही विचार करत असून, त्यासंदर्भात लवकरच नवीन योजना लागू करुन त्या शेतकर्‍यांना मदत करणार असल्याचे आश्‍वासन  अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी दिले आहेत. तसेच ज्या शेतकर्‍यांनी नियमित कर्जाची फेड केली आहे अशा शेतकर्‍यांसाठी आम्ही एक योजना आणणार आहोत, असे देखील त्यांनी सांगितले.
दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरु आहे. सरकार या शेतकर्‍यांना सुध्दा मदत करणार असल्याचे राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकर्‍यांचा विचार केला गेला नाही असे म्हणत शेतकर्‍यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे जयंत पाटील यांनी पुढे असे सांगितले की, दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकर्‍यांची संख्या, त्यांनी घतलेले कर्ज आणि त्यावरील व्याजाची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. तसंच, कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन टीका करणार्‍यांना जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.