Breaking News

लष्करप्रमुखांनी राजकारण शिकवू नये ः पी. चिदंबरम


तिरुवनंतपुरम : देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून अनेकांमध्ये मतभेद आहेत. या कायद्यावरून राजकीय स्टंटबाजीदेखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच लष्करप्रमुखांनी या कायद्याविरोधात आंदोलन कर्त्यांना निशाणा केले. या पार्श्‍वभूमिवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांना सुनावले आहे.
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये. त्यांनी स्वत:च्या कामात लक्ष द्यावे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी केली. ते शनिवारी तिरुवनंतपुरम येथील सभेत बोलत होते. बिपीन रावत यांनी नुकतेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणार्‍यांना लक्ष्य केले होते. आपण सध्या शहरांमध्ये विद्यापीठ, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांची हिंसक आंदोलने पाहत आहोत. पण लोकांना चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे नेते चांगले नसतात, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. आजच्या सभेत पी. चिदंबरम यांनी लष्करप्रमुखांच्या या वक्तव्याला उत्तर दिले आहे.