Breaking News

मोबाईल कंपन्या करणार खिसा खाली

वाढता तोटा व कंपन्यांतर्गत निर्माण झालेली तीव्र स्पर्धा यातून उत्पन्नास फटका बसत असल्याने देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी ही तूट ग्राहकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोन, आयडिया, भारती एअरटेल, रिलायन्स जिओने डिसेंबरपासून दरवाढ करण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यानुसार या कंपन्यांनी रविवारी आपली सुधारित दरपत्रके जाहीर केली. यामुळे कॉलिंग व डेटावापर 40 ते 50 टक्क्यांनी महागले आहे. व्होडाफोन व एअरटेलचे नवे दर लागू झाले आहेत, जिओचे वाढीव दर सहा डिसेंबरपासून अंमलात येणार आहेत.  या संभाव्य वाढीची या कंपन्यांनी आगाऊ सूचना दिली होती. तसेच, ही वाढ न वाटता तो एक नवीन प्लॅन वाटावा, यासाठी सध्याच्या प्लॅनमध्ये अनेक बदल करून नवीन प्लॅनच्या रूपात ते सादर करण्यात आले आहेत. 19 रुपये ते 2300 रुपयांपर्यंतचे हे नवीन प्लॅन प्रत्यक्षात सरासरी 40 टक्के दरवाढ करणारे आहेत या दरवाढीचा बोजा आधीच महागाईत भरडून निघालेल्या ग्राहकांवर पडणार आहे,आधी स्वस्तात ग्राहकांना चटक लावायची व मग विविध कारणे सांगून ग्राहकांना लुटायचे असा काहीसा प्रकार सध्या घडताना दिसत आहे.

वाढता तोटा व कंपन्यांतर्गत निर्माण झालेली तीव्र स्पर्धा यातून उत्पन्नास फटका बसत असल्याने देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी ही तूट ग्राहकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल, रिलायन्स जिओने डिसेंबरपासून दरवाढ करण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यानुसार या कंपन्यांनी रविवारी आपली सुधारित दरपत्रके जाहीर केली. यामुळे कॉलिंग व डेटावापर 40 ते 50 टक्क्यांनी महागले आहे. व्होडाफोन व एअरटेलचे नवे दर लागू झाले आहेत, जिओचे वाढीव दर सहा डिसेंबरपासून अंमलात येणार आहेत.  या संभाव्य वाढीची या कंपन्यांनी आगाऊ सूचना दिली होती. तसेच, ही वाढ न वाटता तो एक नवीन प्लॅन वाटावा, यासाठी सध्याच्या प्लॅनमध्ये अनेक बदल करून नवीन प्लॅनच्या रूपात ते सादर करण्यात आले आहेत. 19 रुपये ते 2300 रुपयांपर्यंतचे हे नवीन प्लॅन प्रत्यक्षात सरासरी 40 टक्केदरवाढ करणारे आहेत या दरवाढीचा बोजा आधीच महागाईत भरडून निघालेल्या ग्राहकांवर पडणार आहे, आधी स्वस्तात ग्राहकांना चटक लावायची व मग विविध कारणे सांगून ग्राहकांना लुटायचे, असा काहीसा प्रकार सध्या घडताना दिसत आहे.
सात वर्षांनंतर या क्षेत्रात दरवाढ होईल. दरवाढ हा आपल्याकडे ग्राहक गमावण्याचा हमखास मार्ग मानला जातो. जी काही सेवा मिळावयाची आहे ती शक्यतो मोफतच मिळालेली बरी आणि मोफत नसेल तर कमीत कमी दाम त्यासाठी मोजावे लागावेत अशीच सर्वसाधारण भारतीयांची इच्छा असते. उत्तम सेवेचा आग्रह धरावा आणि त्याचे चोख दाम मोजावे हे भारतीय ग्राहक मानसशास्त्रात बसत नाही. त्यामुळे उच्च दर्जाचे जागतिक ब्रॅण्ड आपल्या देशात येण्यास धजावत नाहीत. कारण उत्तम संशोधनाअंती सिद्ध केलेल्या आपल्या उत्पादनाच्या स्वस्त प्रतिकृती भारतीय बाजारात रातोरात येतात आणि बघता बघता बाजार काबीज करतात. रिलायन्स जिओ फायबरच्या युजर्संना आता निःशुल्क म्हणजेच फ्री ब्रॉडबँड सेवा मिळणार नाही. कंपनीने नवीन युजर्सकडून ब्रॉडबॅण्ड सेवेसाठी शुल्क आकरण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच कपंनी जुन्या ग्राहकांना देखील ब्रॉडबँड सेवेसाठी रिचार्ज करा किंवा पेमेंट करा अशा सूचना पाठवत आहे. अधिक नफा कमवण्याच्या उद्देशानं कंपनीकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. देशातील मोठ्या शहरांतील जिओ फायबर वापरणार्‍या ग्राहकांनी 2500 रुपयांची अमानत रक्कम जमा केली होती. असं असून देखील त्यांच्याकडून आता अधिकचे सर्व्हिस म्हणजेच सेवा शुल्क आकारण्यात येत आहे. तसंच येणार्‍या काही दिवसांत देशभरात जिओ फायबरच्या युजर्ससाठी व्यावसायिक बिलिंग सुरू होणार आहे. जिओ फायबर बाजारात अधिकृतपणे लॉन्च होण्यापूर्वी ही सेवा सबस्क्राईब केलेल्या तब्बल पाच लाख जिओ फायबरच्या ट्रायल ग्राहकांना कंपनीकडून आता टॅरिफ प्लॅनवर शिफ्ट करण्यात येणार आहे. व्होडाफोन, एअरटेल आणि जिओ या देशातील प्रमुख दूरसंचार आणि डाटा सेवा कंपन्या आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांत इतका तोटा सोसला आहे की या कंपन्या डबघाईस येण्याची शक्यता आहे. केवळ व्होडाफोन कंपनीच 51 हजार कोटींना डुबली आहे. अन्य कंपन्यांचीही स्थिती वेगळी नाही. स्पेक्ट्रम शुल्क दोन वर्षे विलंबाने देण्याची मुभा मिळाल्याने कंपन्यांना जीवदान मिळाले. त्यातूनच ही वाढ अपरिहार्य बनली. प्रत्यक्षात या कंपन्यांना तोटा होण्याची कारणे काय, याचे विश्‍लेषण केल्यास प्रत्येक जनरेशनच्या (2जी, 3जी इत्यादी) संदेशवहनासाठी लागू होणारे शुल्क व तंत्रज्ञानामुळे मिळणारी सुविधा यांचा मेळ या कंपन्यांना बसवता आला नाही. 3जी आणि 4जी मुळे दूरध्वनीसाठी मोफत करता येतात आणि त्यासाठी कंपन्यांना कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. शिवाय भारतात टेलिफोन व मोबाईलधारकांची संख्या आता 120 कोटींच्या घरात असूनही 98 टक्के ग्राहक प्रीपेड धारक आहेत. कंपन्या या स्थितीवर कशी मात करतात, हे आता पाहावे लागेल.एअरटेल आणि व्होडाफोननं 169 रुपये आणि 199 रुपयांचे प्लॅन बंद केले आहेत. लाँच केलेल्या नव्या प्लॅनची किंमतही जास्त आहे. हे प्लॅन बंद करून कंपनीनं 248 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा फक्त एअरटेल टू एअरटेलवर मिळणार आहे. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 एफयूपी मिनिट मिळतील. ते संपल्यानंतर तुम्हाला अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी प्रतिमिनिट सहा पैसे द्यावे लागतील. आता एअरटेलचा दररोज एक जीबी डेटा देणारा कोणताही प्लॅन नाही. 28 दिवस कालावधी असलेल्या सर्वात स्वस्त 248 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. दिवसाला सर्वाधिक डेटा वापर करणारे ग्राहक 298 रुपयांचा प्लॅन घेऊ शकतात. त्यात दररोज 2 जीबी डेटा देण्यात आला आहे. याआधीच्या 249 रुपयांच्या प्लॅनऐवजी हा प्लॅन लाँच करण्यात आला आहे. याशिवाय 84 दिवसांचा कालावधी असलेला 598 रुपये आणि 698 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज अनुक्रमे 1.5 जीबी आणि 2 जीबी डेटा मिळणार आहे. तर 365 दिवस कालावधी असलेल्या 2398 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे.
सुधारित दरपत्रकानुसार व्होडाफोन आयडियाच्या वर्षभर वैध असणार्‍या प्लॅनसाठी आता 50 टक्के दरवाढीसह 1,499 रुपये मोजावे लागतील. आतापर्यंत हा प्लॅन 999 रुपयांना उपलब्ध होता. याच श्रेणीतील 1,699 रुपयांचा अन्य प्लॅन आता 2,399 रुपयांना मिळेल. याशिवाय व्होडाफोनवरून अन्य नेटवर्कच्या फोनला कॉल केल्यास प्रतिमिनिट सहा पैसे आकारले जातील. व्होडाफोन आयडियाने गेली चार वर्षे दर स्थिर ठेवले होते. मात्र, जिओच्या आगमनानंतर बाजारहिस्सा कमी झाल्याने तसेच, विविध थकीत शुल्कांपोटी केंद्र सरकारला सुमारे 80 हजार कोटी रुपयांचे देणे बाकी असल्याने या कंपनीची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. व्होडाफोनसह भारती एअरटेल व रिलायन्स जिओनेही रविवारी दरवाढीची घोषणा केली. सुधारित दरपत्रकानुसार एअरटेलच्या दरात 42 टक्के वाढ झाली आहे. एअरटेलकडूनही अन्य नेटवर्कच्या कॉलसाठी प्रतिमिनिट सहा पैसे आकारले जाणार आहेत. एअरटेलचा वर्षभर वैध असलेला सध्याचा 1,699 रुपयांचा अमर्यादित प्लॅन आता 2,398 रुपयांना उपलब्ध होईल. तर, सध्या 458 रुपयांत मिळणार्‍या 84 दिवसांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 598 रुपये मोजावे लागतील. अमर्यादित श्रेणीतील प्लॅन निवडणार्‍या आमच्या ग्राहकांना सध्याच्या प्लॅनच्या तुलनेत (वेगवेगळ्या प्लॅननुसार) दररोज 50 पैसे ते 2.85 रुपये अधिक द्यावे लागतील. त्याचवेळी त्यांना अधिकचा डेटाही मिळेल,असे एअरटेलच्या पत्रकात म्हटले आहे. रिलायन्स जिओचे नवे दर सहा डिसेंबरपासून लागू होणार असूनही दरवाढ 40 टक्क्यांपर्यंत असेल.
यापूर्वी जिओ कंपनीने भरमसाठ सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित केलेच आहे. आपल्याकडे मुळातच जनसामान्यांची फुकटी व जास्तीत जास्त फायदा घेण्याची प्रवृती आहे. त्यात एखादी कंपनी काही मोफत वा स्वस्तात देत असेल तर पहायलाच नको. या सवयीचा अचूक लाभ घेत जिओने मोठ्या प्रमाणावर ग्राहक खेचून घेतले. त्यामुळे अन्य कंपन्यांनाही आपले दर कमी करावे लागले. ते इतके कमी झाले की किमान भांडवली खर्च वसुलीदेखील त्यामुळे होईनाशी झाली. सुमारे 32 कोटी ग्राहक संख्या असलेल्या व्होडाफोन, आयडिआचा दरडोई ग्राहक महसूल अवघा 107 रुपये इतका आहे आणि एअरटेलसाठी तो आहे 128 रुपये. जिओची परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. पण इंधन क्षेत्रात कमावलेल्या नफ्याची ऊब त्यांच्या खिशास असल्याने आणखी काही काळ तरी इतक्या कमी महसुलावर ती कंपनी तग धरून आहे ते काहीही असले तरी ग्राहकवर्गाला मोबाईलच्या मोहजाळात अडकवून या कंपन्यांनी आता लूट सुरू केली आहेच व डेटा वापराचा शौकीन झालेला व चटक लागलेला ग्राहक या कंपन्यांच्या मोहजाळात आपला खिसा मात्र खाली करणार आहे.