Breaking News

सावित्रीबाई फुलेंची काँगे्रसला सोडचिठ्ठी


लखनऊ ः सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजपला सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या सावित्रीबाई फुले यांनी एका वर्षातच काँग्रेसचा हात सोडला आहे. सावित्रीबाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिला असून स्वत:चा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली. सावित्रीबाई फुले यांनी आरोप केला आहे की, माझा आवाज पक्षात ऐकला जात नाही. म्हणून मी राजीनामा देत आहे. मी माझा स्वत: चा पक्ष स्थापन करणार आहे. दरम्यान, बहराइच मतदार संघाच्या भाजपच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी 6 डिसेंबर 2018 रोजी लखनऊ येथे भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली होती.