Breaking News

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड

Fadanvis
मुंबई
महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाने एकमताने पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली. आज विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. विधानसभा अध्यक्षांची निवड एकमताने व्हावी यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला शिवसेनचे विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, सुभाष देसाई हे नेते उपस्थित होते. दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाने एकमताने पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली. आज विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
कार्यक्रम विरोधी पक्षनेते निवडीचा उल्लेख नसल्याने त्यामुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते निवडीबाबतची अधिकृत घोषणा लांबणीवर पडणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, 16 ते 21 डिसेंबरदरम्यान नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. उद्धव ठाकरे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर या विधानसभा अध्यक्षांची निवड ही एकमताने व्हावी, असे आवाहन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले. नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ही गोपनीय मतदान होत असते. पण कालचा विश्‍वासदर्शक ठराव जिंकला असला तरीही सरकार कुठलाही धोका पत्करायला तयार नाही.म्हणूनच विधानसभा अध्यक्षांची निवड निवडणूक खुल्या पद्धतीने व्हावी, असा प्रस्ताव सरकारतर्फे विधानसभेत मांडला जाऊ शकतो. त्यासोबतच राज्यपालांचे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहासमोर संयुक्त अभिभाषण होणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपविरुद्ध काँग्रेस अशी चुरस निर्माण झाली होती. काँग्रेसने महाविकासआघाडीकडून नाना पटोले यांच्या नावाची तर भाजपकडून किसन शंकर कथोरे यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने एकत्र येऊन महाविकासआघाडी तयार केली आहे. शनिवारी भाजपने सभात्याग केल्यानं विधिमंडळात झालेल्या बहुमत चाचणीत महाविकास आघाडीने 169 विरुद्ध 0 अशा मतांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. भाजपच्या 105 आमदारांनी सभात्याग केला.
काँग्रेस नेता माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसकडून विधासभा अध्यपदासाठी नाना पटोलेंच्या नावाची घोषणा केली आहे. महाविकासआघाडीकडून नाना पटोले उमेदवार असतील असं माणिकराव ठाकरे म्हणाले. पटोले विदर्भातील साकोली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं शनिवार आणि रविवार असं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं. शनिवारी सभागृहाचं कामकाज सुरू होताच हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी घेण्यात आली. भाजपने सभात्याग केल्यानं उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं बहुमतानं विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. यामध्ये 169 मते ठरावाच्या बाजूने तर 4 तटस्थ आणि भाजप 0 अशी मतं मिळाली.
विधानसभा अध्यक्षपदानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार आणि उपमुख्यमंत्रिपदही अद्याप बाकी आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत आमदार जयंत पाटील विरुद्ध अजित पवार अशी रस्सीखेच असल्यानं अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून एका नावावर शिक्कामोर्तब होत नाही आहे. त्यामुळे कोणाला उपमुख्यमंत्रिपद देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडे महत्त्वाची खाती जाणार की राष्ट्रवादीच्या गोटात महत्त्वाची खाती जाणार हे पाहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे. नागपुरात होणार्‍या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर 3 आणि 4 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्रिपद आणि काही खातेवाटपाबाबत चर्चा होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.