Breaking News

शिवदुर्गचे इंगळे यांना आतंरराष्ट्रीय पुरस्कार
कोळगाव/प्रतिनिधी
 श्रीगोंद्याचे राजेश इंगळे यांना जागतिक संविधान संघाचा यावर्षीचा Excellent Trecker in the World २०१९ हा पुरस्कार प्राप्त झाला. जागतिक संविधान दिना निमित्त जागतिक संविधान संघाच्या वतीने वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवार्ड २०१९ चा पुरस्कार वितरण व सभासदत्व प्रदान सोहळा नुकताच श्रीरामपूर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात  WCPA चे अमेरिकाचे अध्यक्ष डॉ.ग्लेन मार्टिन यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक होत्या.
 छत्रपती शिवरायांच्या गडकोटांची माहिती, अभ्यास करण्यासाठी व छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक भूगोल समजून घेण्यासाठी राजेश इंगळे यांची भटकंतीची सुरु आहे. एक वर्षांपूर्वी भटकंती करताना रस्ते अपघातात पायाला जबर मार बसल्याने गुडघ्यावर मोठी शस्रक्रिया करण्यात आली होती. यातूनही सावरत पुन्हा नव्याने उभारी घेऊन कठीण परिस्थितीत किल्ले चढाई त्यांनी सुरू सुरूच ठेवली. या कार्याची दखल जागतिक संविधान संघाने दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
 या कार्यक्रमात भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्कृष्ट सामाजिक व लोकोपयोगी कार्य करणाऱ्या ४८
 प्रतिभावंत व्यक्तींना सन्मानीत करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल पवार, ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक प्रा. ई.पी.मेनन, अर्थतज्ञ नरसिंहा मूर्ती उपस्थित होते. तर  WCPA श्रीरामपूरचे चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.शिवदुर्ग प्रेमी प्रतिष्ठाण शिरूर, पुणे व शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन, श्रीगोंदे या दोन संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अखंड भटकंती केली आहे. एक वर्षा पूर्वी झालेल्या अपघातानंतर २७ किल्ले व सह्याद्रीच्या वाटा पादाक्रांत केल्या आहेत. हे सर्व करताना मित्रांची, सहकाऱ्यांची व पत्नीची यांची साथ मिळत आहे म्हणून हे साध्य करता आले.
- राजेश इंगळे,
अध्यक्ष, शिवदुर्ग ट्रेकर्स  फाउंडेशन