Breaking News

तरुणांच्या प्रश्नांसाठी लंकापती प्रतिष्ठानची स्थापनाअहमदनगर / प्रतिनिधी
शहरातील तरुणांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी माळीवाडा येथे लंकापती प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.या प्रतिष्ठानचे उद्घाटन . संग्राम जगताप यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी बोलताना . संग्राम जगताप म्हणाले, आजच्या युगात तरुण पिढी भरकटत चाललेली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तरुणांना जीवनाच्या प्रवाहात आणून त्यांचे प्रश् सोडवावे तसेच या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक कामे हे तरुण करतील, असा आहे.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत भिंगारदिवे म्हणाले, प्रतिष्ठानच्या माध्यमातून तरुणांचे प्रश्न मार्गी लावले जातील तसेच तरुण वर्गासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातील. यावेळी संतोष लांडे, सोनू घेम्बुड, शांताराम खैरनार, शिरीष विधाते, बाळासाहेब सांगळे, किरण गुंजाळ, सोनू भोसले, नगरसेवक प्रशांत गायकवाड, राजू लोटके, अभिषेक बोडखे तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.