Breaking News

सरस्वती मंदिर नाईट स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


अहमदनगर / प्रतिनिधी
येथील नवविद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट स्कूल, अहमदनगर या रात्रशाळेमध्ये  वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. . शाळेचे  मुख्याध्यापक संतोष गवळी  होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर किरण काळापहाड होते. प्रास्ताविक स्वागत मानद सहसचिव चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले. अहवाल वाचन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विलास शिंदे यांनी  केले. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमाद्वारे उत्कृष्ट मनोरंजनात्मक गीत नृत्य सादर केले. स्नेहसंमेलनानिमित्त विविध मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमुख पाहुणे काळापहाड यांनी  प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण आपल्या कष्टाच्या जोरावर समाजात स्थान निर्माण करू शकतो, हे स्वतःच्या उदाहरणातून सांगितले. या कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनीही भविष्यात नावलौकिक मिळवावा, असे मत व्यक्त केले. दिवसभर काम करून रात्रीच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष गवळी यांनी कौतुक केले तसेच  गरजू विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
पारितोषिक वितरणप्रसंगी विविध स्पर्धेतील गुणवंत  विद्यार्थ्यांच्या  सत्काराबरोबरच दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी सुभाष श्रीगोंदेकर यांनी दहावीतील प्रथम विद्यार्थिनी मनीषा ननवरे हिला रोख पारितोषिक दिले. याप्रसंगी नवविद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव निलेश वैकर, सहसचिव चंद्रशेखर धर्माधिकारी, माजी शिक्षक डहाळे सर, प्रा. कात्रे सर, माजी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वीणा कुऱ्हाडे  आभार प्रदर्शन  श्रीमती सुषमा धारूरकर यांनी केले. कार्यक्रमास शिक्षकेतर कर्मचारी राजू भुजबळ यांचे सहकार्य लाभले.