Breaking News

जगभरात अनुभवला सुर्य-चंद्राचा लपंडाव


दिल्ली/मुंबई : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज जगभरात पाहिले गेले. एकुण साडेतीन तासांच्या या ग्रहणाची सुरूवात भारतात सकाळी 8 वाजून 4 मिनिटांने सुरु झत्तली. तर 10.57 वाजता ग्रहण संपले. या सूर्यग्रहाणाचा परिणाम भारतासह नेपाळ, चीन, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांवर दिसून आला.
देशाच्या मोठ्या भागातून आज सकाळी झालेले सूर्यग्रहण बघता आले. पण काही ठिकाणी ढग असल्यामुळे तेथील नागरिकांना प्रत्यक्ष डोळ्यांनी हे ग्रहण बघता आले नाही. आज झालेले सूर्यग्रहण चालू वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. दिल्लीसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात गुरुवारी असलेल्या ढगाळ वातावरणांमुळे सुर्यग्रहण बघता आले नाही. सरत्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज झाले. हे सूर्यग्रहण जगाच्या अधिकाधिक भागात पाहिले गेले असल्याने हे ग्रहण विशेष मानले जात आहे. हे सूर्यग्रहण सर्व आखाती देशांमध्येही पाहिले जात आहे.