Breaking News

शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी


त्रिवेंद्रम : काँग्रेस नेते, खासदार शशी थरूर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. हिंदू समाजातील महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तिरुवनंतपूरम कोर्टाने थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. त्यामुळे थरूर यांच्या पुढील अडचणीत वाढ झाली आहे. शशी थरूर यांनी त्यांच्या एका पुस्तकातून हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.