Breaking News

आशुतोष गोवारीकर यांनी मानले राज ठाकरे यांचे आभार

मुंबई
पानिपतच्या प्रदर्शनापूर्वीच आशुतोष गोवारीकरांना मोठी शाबासकी मिळाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका विशेष प्रदर्शन कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ट्विटर द्वारे राज यांनी आशुतोष गोवारीकरांचे कौतुक केले आहे. पानिपत हा मराठी माणसाने नव्हे तर प्रत्येक भारतीयाने पाहावा असा चित्रपट आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पानिपतची लडाई ही मराठ्यांची हार नसून सांस्कृतिक आणि राजकीय आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी दाखविलेले शौर्य आहे असे ते म्हणाले. यापूर्वीही पानिपतच्या ट्रेलरची राज यांनी प्रशंसा केली होती.
राज ठाकरे यांनी केलेल्या कौतुकाबद्दल दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी त्यांचे आभार मानेल आहे. ट्विटर द्वारे ते म्हणाले,  प्रिय राज, अठराव्या शतकात हिंदूस्थानमधे राजकीय आणि सामाजिक उलथापालथ घडवणा-या या महाप्रचंड शौर्यगाथेला इतक्या सुंदर आणि मोजक्या शब्दांत बंदिस्त करून पानिपत चित्रपटाबद्दल तुम्ही काढलेल्या गौरवोद्गाराबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्यासारख्या रसिक मित्राचं पाठबळ मिळाल्यावर अंगामधे दहा हत्तींचं बळ येतं!  आशुतोष गोवारीकरांच्या बहुचर्चीत आणि बहुप्रतीक्षित ’पानिपत ’ चित्रपट शुक्रवार 6 डिसेंबर रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.